Monday, 26 March 2018

संविधानिक पद्धतीने अध्यक्षांवरील विश्वास दर्शक ठराव मांडण्यात आला - मुख्यमंत्री


मुंबई, दि.26 :विधानसभेत अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठरावाशिवाय सभागृहाचे कामकाज होऊ शकत नाही. 23 (1) नियमातील तरतुदींची पुर्तता करून, संविधानिक पद्धतीने सभागृहात अध्यक्षांवरील विश्वास दर्शक ठराव मांडण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत विरोधकांनी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या संदर्भात अविश्वास ठराव मांडला होता. यासंदर्भात  शासनाने अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडला त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, विश्वासदर्शक ठरावाशिवाय कामकाज होऊ शकत नाही. 179 अंतर्गत अध्यक्षांच्या पदाला संरक्षण देण्यासंदर्भात तरतूद आहे. अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव मांडण्याची 23 (1) अन्वये नोटीस देण्यात आली होती. 23(1) नियमाच्या तरतुदीची पर्तता करून प्रस्ताव मांडला. आवाजी पद्धतीने सभागृहाने तो मंजूर केला आहे. प्रथा परंपरेनुसार सदनाचे कामकाज सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्रयांनी दिली.
००००

No comments:

Post a Comment