Saturday, 21 April 2018

तूरडाळीसाठी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडे मागणी नोंदवा


55 रुपये प्रतिकिलोने उपलब्ध होणार
         नागपूर, दि. 21 : शासनाच्या वतीने बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत भरडाई करून तयार करण्यात आलेली तूरडाळ 55 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा पणन अधिकारी कार्यालयामार्फत मागणी नोंदविण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.
            राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजने अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई करून तयार करण्यात आलेली डाळ स्वस्त दराने शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यालयांना, कार्यालयाशी संबंधित सहकारी संस्थांना देण्यात येणार आहे. प्रति किलो 55 रुपये दराने डाळ घेऊ इच्छिणाऱ्यांनी जिल्हा पणन अधिकारी, दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटींग फेडरेशन ली. नागपूर बॅ. शेषराव वानखेडे ट्रस्ट, शेतकरी भवन दुसरा माळा, गणेशपेठ, नागपूर, ई-मेल- dmo.nagpur@mahamarkfed.org, दूरध्वनी क्रमांक 0712-2620673 भ्रमणध्वनी क्रमांक 9423112361,9822562816 यावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
****

No comments:

Post a Comment