* राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत विभागीय कार्यशाळेचे
आयोजन
नागपूर, दि. 23 : माता आणि बालक यांचे आरोग्य सुदृढ राहावे, याकरिता शासनाच्या
वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. ग्रामीण पातळीवर आरोग्य विभागात काम करणाऱ्या
प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन
राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक तथा आयुक्त
डॉ. संजीव कुमार यांनी केले.
येथील
कविवर्य सुरेश भट सभागृह येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विभागीय कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी
विभागीय आयुक्त अनूप कुमार, केंद्रीय सहसचिव विकास शिल, माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके,
एनएचएसआरसी नवी दिल्लीचे सल्लागार डॉ. हिमांशू भूषण, आरबीएसकेचे राष्ट्रीय सल्लागार
डॉ. अरुण सिंग, डब्ल्यूएचओ समन्वयक डॉ. सुब्रमण्यम, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण
मंत्रालयाचे उपायुक्त डॉ. एस. के. सिकंदर, उपसंचालक डॉ. सुनील खापर्डे, राष्ट्रीय तंबाखू
नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध कडू, डॉ. गोविंद त्रिपाठी आदी उपस्थित
होते.
कार्यशाळेच्या
माध्यमातून आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी माता व बालकांच्या आरोग्यावर सुधारणेवर भर
देताना आरोग्याची काळजी घेणे, अर्भक मृत्यू, बालमृत्यू दर नियंत्रित करणे, पाच वर्षाखालील
बालमृत्यूदर, बाळाच्या जन्मानंतर सांभाळ, त्याची योग्य ती काळजी घेणे, क्षयरोग, एचआयव्ही
व मलेरियामुळे झालेले मृत्यूचे प्रमाण आर. सी. एच. कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यास
कमी करता येऊ शकते, यांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
विभाग प्रमुखांनी आरोग्य सेवेकडे लक्ष देणे आवश्यक – अनूप कुमार
ग्रामीण
पातळीवरील आरोग्य यंत्रणांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. ग्रामपातळीवर सेवा देणाऱ्या
आरोग्य कर्मचाऱ्याने पारंपारिक पद्धतीऐवजी तांत्रिक संसाधनांचे ज्ञान घेऊनच सेवा दिली पाहिजे. तेव्हाच नवीन तंत्रज्ञानासोबतच
अधिकाधिक लोकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळू शकेल. याकरिता आरोग्य विभागासोबतच जिल्हा
प्रशासनाच्या वतीने अशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी,
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांनी याकडे लक्ष दिल्यास
आरोग्य सेवेत सुधारणा होण्यास मदत होईल, असे अनूप कुमार म्हणाले.
आरोग्याशी
संबंधित कुठलाही उद्रेक होऊ नये, याकरिता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वयं प्रेरणेने
पुढाकार घेण्याची गरज आहे. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी
यांनी समन्वय साधून जिल्हयात सूक्ष्मकृती आराखडा तयार करुन बाल व माता मृत्यूशी संबंधित
समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न केला. तसाच प्रयत्न इतर जिल्ह्यातही झाला पाहिजे. याकरिता
इडीकेटर सुधारणा, उद्दिष्ट पूर्तीसाठी ध्येय निश्चिती करता यावी, याकरीता ही कार्यशाळा
आयोजित केल्याचे विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले.
कार्यशाळेत
उपस्थित विकास शिल, डॉ. सुभाष साळुंके, डॉ. हिमांशू भूषण, डॉ. अरुण सिंग, डॉ. सुब्रमण्यम,
डॉ. एस. के. सिकदर, डॉ. सुनील खापर्डे, डॉ. अनिरुद्ध कडू, डॉ. गोविंद त्रिपाठी यांनी
सादरीकरण केले. कार्यशाळेत विभागातील सर्व
प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment