Tuesday, 5 June 2018

विधि विद्यापीठांना पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी पाच कोटी रुपये निधी देणार

उच्च  तंत्र शिक्षण विभाग

मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठांना त्यांचा दैनंदिन प्रशासकीय  शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी 2018-19 याआर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा ठोक निधी दरवर्षी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ अधिनियम-2014 मधील तरतुदींनुसार मुंबईमध्ये 2015-16 पासून, नागपूरमध्ये 2016-17 पासून तर औरंगाबाद येथे2017-18 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ सुरु झाले आहे. या विद्यापीठांना त्यांचा दैनंदिन प्रशासकीय  शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी2018-19 या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षे प्रत्येकी पाच कोटी रुपये इतकी ठोक रक्कम दरवर्षी देण्यात येईल. या निधीतून विधि विद्यापीठांना मंजूरआकृतीबंधानुसार भरलेल्या पदांचे वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन आणि अन्य दैनंदिन प्रशासकीय  शैक्षणिक खर्च भागवता येणार आहे.
-----0-----

No comments:

Post a Comment