Tuesday, 28 August 2018

राज्यात 1 सप्टेंबरपासून ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम

मोहिमेला जनचळवळीचे स्वरुप देण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन


मुंबईदि. 28 : कुपोषणमुक्तीच्या कार्यक्रमाला गती देण्याच्या तसेच जनमानसात विशेषत: पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 कालावधीत राज्यात राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला -बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून महाराष्ट्रात या उपक्रमाला जनचळवळीचे स्वरुप देण्यासाठी यात सर्वांनी सहभागी व्हावेअसे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.
सही पोषणदेश रोशन’ असे घोषवाक्य या मोहिमेसाठी निश्चित करण्यात आले आहे. बालकांमधील कुपोषणखुजेपणाबुटकेपणारक्तक्षय कमी करणेकिशोरवयीन मुली आणि महिलांमधील रक्तक्षय कमी करणेजन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करणे आदी उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत. महिला आणि बालविकास विभाग हा या मोहिमेचा नोडल विभाग म्हणून काम करणार असून ग्रामविकाससार्वजनिक आरोग्य,पाणीपुरवठा व स्वच्छतामाहिती व जनसंपर्कशालेय शिक्षणआदिवासी विकासअन्न व औषध प्रशासन आदी विभागांच्या एकत्रीत सहभागातून ही मोहीम राबविली जाणार आहे.
मोहीम कालावधीत म्हणजे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये पोषण आहाराविषयी जनजागृतीसाठी राज्यात ग्रामसभाप्रभातफेरी,चित्रफितीचे प्रदर्शन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. शुन्य ते 6 वयोगटातील बालकांचे वजन घेणे व छाननी करणेशौचालयाच्या वापराबाबत तसेच साबणाने हात धुण्याबाबत बालकेमहिलाज्येष्ठ नागरिक आदींना सवय लावणेग्रामस्तरावर बेटी- बेटा सांख्यिकी आकडेवारी दर्शविणारा फलक लावणेबेटी बचाओ – बेटी पढाओ अभिसरण कृती आराखडा बैठकीचे आयोजनमहिला ई-शक्ती कार्यक्रमएनएसएसनेहरु युवा केंद्र,महिला बचतगटएनजीओ आदींचा सहभाग घेणेसॅनिटरी नॅपकीनची उपलब्धता सुलभ करणेमहिलांसाठी योगासनांचे महत्व पटवून देणेचांगल्या आरोग्यदायी सवयींबाबत लोकजागृतीसाठी गृहभेटी करणेकिशोरवयीन मुलींकरिता जनजागृती शिबिर आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या मोहिमेला जनचळवळीचे स्वरुप द्यावेअसे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.
मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
दरम्यान, ‘राष्ट्रीय पोषण महिना’ प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदींशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. विविध विभागांच्या समन्वय आणि सहभागातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावीअसे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयलशालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णावैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुखआयसीडीएसच्या आयुक्त श्रीमती इंद्रा मालो आदी अधिकारी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment