Friday, 24 August 2018

'दिलखुलास' कार्यक्रमात वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार


  मुंबई, दि. २४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सोमवार दि. २७ आणि मंगळवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक शैलेश पेठे यांनी घेतली आहे.
            शासनाने रोजगार निर्मितीचा आढावा व रोजगार संधी निर्मितीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी, दरडोई उत्पन्न वाढीसाठी शासन प्रयत्नशील आहे.  चांदा ते बांदा पथदर्शी योजना, महाराष्ट्र मानव विकास मिशनचे कामकाज,  मुद्रा  योजनेची  राज्यात होत असलेली  प्रभावी अंमलबजावणी  तसेच महाराष्ट्राचे उद्योगातील योगदान याबाबतची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.  
0000

No comments:

Post a Comment