Thursday, 2 August 2018

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा आणि जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे


मुंबई, दि. 2 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आणि पालघर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांची मुलाखत घेण्‍यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या शुक्रवार दि. 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
1 ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा निर्मितीला चार वर्ष पूर्ण झाली त्याअनुषंगाने जिल्हयातील आव्हाने आणि त्यावर केलेल्या उपाय योजना, सिडको मार्फत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती, आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाचे कातकरी उत्थान अभियान, गोधडी उपक्रम, कुपोषण मुक्तीसाठी केलेले प्रयत्न, रोजगार वाढीसाठी तसेच पर्यटन विकासासाठी प्रशासनाने उचलेली पाऊले, शेतीच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेले उपक्रम आदी विषयांची माहिती श्री. सवरा आणि डॉ. नारनवरे  यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे .
००००

No comments:

Post a Comment