Tuesday, 28 August 2018

'दिलखुलास' कार्यक्रमात मत्स्य विकास आयुक्त अरुण विधळे


            मुंबई, दि. 28: माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात मत्स्य विकास आयुक्त अरुण विधळे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून बुधवार दि. 29 आणि गुरूवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पूर्णिमा शिंदे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            जेलीफिशने चावा घेतल्यास प्रथमोपचार व उपाय, राज्यातील एकूण उत्पन्नात मासेमारीचे प्रमाण, मासेमार बांधवांसाठी व मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी  राबविण्यात  येणाऱ्या योजना, मासेमारी करताना समुद्र सीमा ओलांडून दुसऱ्या देशांच्या सीमा रेषेकडे जाण्यापासून वाचविण्यासाठी घ्यावयाची खबरदारी तसेच मत्स्य व्यवसाय विभागाच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती श्री. विधळे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment