मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 14 प्रकारच्या शौर्यपदक
/ सेवापदक धारकांना शासकीय अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येते. ठाण्याचे
एस.एस.44861 डब्ल्यु-मेजर कौस्तभु प्रकाशकुमार राणे यांना राज्य शासनामार्फत
देण्यात योणारी अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
एस एस 44861 डब्ल्यु मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे
यांना 26 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती
सचिवालयामार्फत सेना पदक प्रदान करण्यात आले आहे. शहीद मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार
राणे योना एकुण 6 लाख रुपये इतके अनुदान देण्यात येणार असून यापैकी महाराष्ट्र
गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम म्हणजेच
4 लाख 50 हजार रुपये शासकीय अनुदानातुन आणि 25 टक्के रक्कम म्हणजे 1 लाख 50 हजार
रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत. ही रक्कम ठाणे
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा
संकेताक 201807541223475207 असा आहे.
००००
No comments:
Post a Comment