* आरोग्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणाचा आढावा
नागपूर, दि.29 -वातावरणातील
संमीश्र बदलामुळे डेंगी,स्वाईन फल्यु व स्क्रब टायफस अश्या आजारांनी डोकं वर काढले आहे. नागपूरात
स्क्रब टायफस या जीवाणुजन्य आजाराच्या प्रतीबंधासाठी या आजाराचे रुग्ण आढळलेल्या
भागात किटकनाशक फवारणी करावी असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी आज
दिले.
स्क्रब टायफस या आजारासंबंधी आरोग्य यंत्रणांचा आढावा घेणारी बैठक आज उपसंचालक
आरोग्य यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल,
सहायक संचालक हिवताप डॉ . मिलींद गणवीर,डॉ.योगेन्द्र बन्सोड यासह आरोग्य यंत्रणाचे
वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. आढावा
बैठकीनंतर माध्यमप्रतीनिधीशी आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी संवाद साधला.
स्क्रब टायफस या आजाराचा जीवाणु हा उंदीर ,घुशी,यांच्या अंगावर आढळत असल्याचे
सांगुन डॉ.दिपक सावंत म्हणाले की गवत किंवा झुडपांवर ही हा जीवाणु आढळत असल्याचे लक्षात आले आहे. या
आजाराची लक्षणे ही ताप येणे,डोकं दुखणे,अशी आढळतात अशी माहीती त्यांनी यावेळी
दिली.
स्क्रब
टायफस या रूग्णांच्या शरीरावर प्रथमत खपली कींवा चटटा दिसतो. अकोला,अमरावती,नागपूर
,वर्धा,गडचिरोली या भागातुन एकुण 24
संशयीत रूग्ण शहरातील खासगी व शासकीय रूग्णालयात दाखल झाले होते. संसर्ग झालेल्या रूग्णांच्या शरीरातील अवयवयंत्रणा निकामी झाल्याने आतापर्यत 6
रुग्णांचा मृत्यु ओढवला आहे.
स्क्रब टायफसचे रुग्ण हे अन्य राज्यातुन
देखील उपचारासाठी येथे आले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या आजारावर
ॲजीथ्रोमायसीन व डॉक्सीसायक्लीन ही औषधे
मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. शासकीय वैदयकीय महाविदयालय व इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालयात रुग्णांसाठी आवश्यक त्या
सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
शहरात किटकनाशकांची फवारणी करण्याच्या
सुचना त्यांनी महानगरपालीकेच्या
अधिकाऱ्यांना दिल्यात.स्क्रब टायफस सोबतच डेंगी,स्वाईन फल्यु ,मलेरीया या आजाराला
पायबंद घालण्यासाठी नागरीकांनी देखील प्रतीबंधात्मक सुचनांचे पालन करावे असे आवाहन
ही त्यांनी यावेळी केले.
शहरातील उदवाहनांमध्ये व होर्डीग व्दारे देखील या आजाराविषयी जाणीव जागृती
करणारे प्रचार साहित्य लावण्याची सुचना
यावेळी मंत्री महोदयांनी आरोग्य
यंत्रणांना केली. स्क्रब टायफस या आजारामुळे
नागरीकांनी घाबरून न जाता प्रतीबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहन
त्यांनी यावेळी त्यांनी केले.
स्क्रब
टायफस हा जलद गतीने वाढणारा आजार असून ट्रॉम्बीकुलीड माईट या किटकाच्या अळी
(चिगर)च्या दंशामुळे रिकेटसीया सुत्सुगुमासी या जिवाणुचा मनुष्याच्या शरीरात
प्रवेश झाल्यास हा आजार होतो. ट्रॉम्बीकुलीड माईट हे किटक मुख्यत: उंदिर, घुस या
सारख्या प्राण्यांच्या शरीरावर आढळतात. स्क्रब टायफस या आजाराचे प्रसारचक्र
खालीलप्रमाणे –
दुषित उंदिर / घुस – ट्रॉम्बीकुलीड माईटची
अळी (चिगर) मनुष्य – अदुषित उंदिर / घुसी
जोखमीचे घटक – शेतात काम करणारे व जंगलात काम करणारे मजूर, गावाच्या टोकाला राहणारे, अध्या
बाह्यांचे, तोकडे कपडे घालणारे व्यक्ती, हातमोजे न घालता कामे करणे, रोगप्रतिकार
शक्ती कमी असलेल्या व्यक्ती.
लक्षणे - डोके दुखी, थंडी वाजून तिव्र ताप
येणे, मळमळ सुस्ती येणे, शरीरात कंपण सुटणे, लसीक गाठीमध्ये सुज, सांधेदुखी, कोरडा
खोकला, न्युमोनिया सदृश्य आजार. बारीक किटक (चिगर) चावल्याने खाज व अंगावर चट्टे
येणे. चिगरदंश झालेल्या ठिकाणी जखम होऊन खिपली येणे.
सामान्य प्रतिबंधक उपाय - स्क्रब टायफसची लक्षणे आढळल्यास किंवा
ताप असल्यास त्वरीत डॉक्टरांकडे, आरोग्य कर्मचाऱ्याकडून उपचार करुन घ्यावा. लवकर
उपचार घेतल्यास हा रोग पुर्णत: बरा होतो. पूर्ण शरीर झाल्या जाईल असे कपडे
घालावे. साफसफाईची दक्षता घ्यावी. घरात पाळलेल्या पाळीव प्राण्यांच्या स्वच्छतेची
काळजी घ्यावी. घराच्या आजूबाजूला गवत व अतिरीक्त वाढलेली झाडे काढून टाकावी.
लोकांना आरोग्य शिक्षण द्यावे.
विशिष्ट प्रतिबंधक उपाय - किटक तिरस्करणीय मलम उदा. डायइथील
टॉल्युअमाइड किंवा बेनझील बॅन्झोईट अंगावर लावावे. उंदीर नियंत्रणाकरिता उपाय
करावे. उदा. उंदीर मारन्याचे औषध टाकावे. कपडे बदलत असतांना किटक असल्याची तपासणी
करावी. कपडे झटकून घालावे. झाडा-झुडपात काम करुन आल्यावर आपले कपडे गरम पाण्यात
भिजवावे. गरज पाण्याने आंघोळ करावी. घरे, दवाखाना, कार्यालयाच्या परिसरात
वाढलेल्या गवतावर 20 सेंटीमीटर उंचीपर्यंत किटकनाशकाची फवारणी करावी. उदा.
मॅलाथिऑन, फेनथिऑन, डेल्टामेथ्रीन, डायझीनॉम.
स्क्रब टायफस हा आजार एका
व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. मात्र एका व्यक्तीच्या शरीरावर,
कपड्यावर चिकटलेल्या दुषित चिगर त्याच्या निकट संपर्कातील व्यक्ती पर्यंत पोहचू
शकतात.
*****
No comments:
Post a Comment