Tuesday, 27 November 2018

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार बासरी वादक पं. केशव गिंडे यांना घोषित


मुंबई दि. २७ :  राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१८ साठी ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबई येथे केली.

प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु. ५ लाख रोखमानपत्रसन्मानचिन्ह असे आहे.  सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उस्मान खानसदानंद नायमपल्लीशाम गुंडावारश्रीमती भारती वैशंपायनबाळ पुरोहित आणि श्रीमती शुभदा पराडकर यांच्या समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे यांची शिफारस केली होती.  यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकरपं.जसराजश्रीमती प्रभा अत्रेपं.राम नारायणश्रीमती परवीन सुलताना आणि श्रीमती माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
पं.केशव गिंडे यांचा जन्म ५ सप्टेंबर१९४२ साली पुणे येथे झाला.  संगीतामध्ये त्यांनी पी.एच.डी केलेली आहे. त्यांना बासरी वादनामध्ये अधिक रस होता. बासरीवादनाचे शिक्षण त्यांनी गुरु स्व. पं. देवेंद्र मुर्डेश्वरपं. हरिपद चौधरी यांच्याकडे घेतले. पं. केशव गिंडे यांनी देशात आणि परदेशात आयोजित होणाऱ्या संगीत मैफिलीत तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शन वर अनेक राष्ट्रीय संगीत सभेत सहभाग घेतला. तसेच परदेशातील विद्यापीठात मास्टर डिग्रीच्या मुलांना शास्त्रीय संगीताचे प्रात्याक्षिकासह व्याख्याने  दिलेली आहेत.
पं.केशव गिंडे यांनी वेदकाळापासून चालत आलेल्या बासरीमध्ये अभूतपूर्व परिवर्तन केलेले आहे. आणि त्यांनी आपल्या दादागुरु पं.पन्नालाल घोष यांच्या पाऊलखुणांवर चालत "केशव वेणू" या बासरीची निर्मिती १९८४ साली केली आहे.  या बासरीची नोंद  "लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्" तसेच "गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्" मध्ये घेण्यात आली आहे. ही बासरी "सात सप्तकात" वाजवण्याचा "गोल्डन बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" त्यांच्या नावावर आहे. रसिक जनसंगीत तज्ञसमीक्षक तसेच बासरी वादकांनी या नव्या संशोधनाचा गौरव केला आहे आणि येणाऱ्या बासरी वादकांसाठी ही बासरी आदर्श राहील असे वर्णन केले आहे.
पं.केशव गिंडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.  पं.केशव गिंडे हे अमुल्य ज्योती पब्लिक ट्रस्ट चे अध्यक्ष असून संगीत आणि बासरी चा प्रचार-प्रसार-प्रबोधनसंशोधन व सवंर्धन याचे कार्य अनेक बासरी वादक शिष्यांच्या सहकार्याने करत आहे.  
श्री.गिंडे यांना भारत सरकारद्वारे सिनियर फेलोशिपसहारा इंडिया यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार जगदगुरु शंकराचार्य श्रृंगेरी महपीठ यांनी वेणू विद्वान पदवी देऊन गौरविले आहे. 4 तपाहून अधिक काळात श्री.गिंडे यांच्याकडे हजारों विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.
0000

No comments:

Post a Comment