मुंबई, दि. 4 :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'लोकसंवाद' कार्यक्रमातून राज्यातील लाभार्थ्यांशी नुकताच संवाद साधला. 'लोकसंवाद' हा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क
महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' मध्ये
राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शनिवार दि. 5 आणि सोमवार दि. 7 जानेवारी
रोजी सकाळी 7.25ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.
शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर
लाभार्थ्यांना मिळालेला योजनांचा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी व आवश्यक
सुधारणांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 जानेवारी रोजी 'लोकसंवाद'
कार्यक्रमाव्दारे जाणून घेतली. सन 2022 पर्यंत प्रत्येक बेघर कुटुंबाकडे
आपला हक्काचा निवारा असावा, असा निर्धार प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांनी केला आहे. याच
अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजना,
रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, शौचालयाचे बांधकाम, अनुदान वेळेत मिळाले का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे
प्रत्यक्ष लाभार्थ्यांकडून जाणून घेतली.
मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे 'दिलखुलास'
कार्यक्रमातून प्रसारण होणार आहे.
००००
No comments:
Post a Comment