वृ.वि. 77
मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' व 'दिलखुलास' कार्यक्रमात ‘खेलो इंडिया’ या विषयावर शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य,अल्पसंख्याक विकास व वक्फ मंत्री विनोद तावडे, कबड्डीपट्टू सायली जाधव, अभिलाषा म्हात्रे व रोईंगपटू दत्तू भोकनळ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 8 जानेवारी रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून मंगळवार दि. 8 व बुधवार दि. 9 जानेवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.
खेलो इंडिया चे यजमानपद प्रथमच महाराष्ट्राला मिळाले आहे. केंद्र व राज्य सरकार यांचा स्पर्धेतील सहभाग, स्पर्धेत कोणत्या खेळांचा समावेश आहे, खेलो इंडिया युथ गेम्सची वैशिष्ट्ये, स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाने केलेले नियोजन याबाबतची माहिती श्री. तावडे यांनी 'जय महाराष्ट्र' व ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे. या कार्यक्रमात खेळाडूंचा सुध्दा सहभाग असून त्यांनी राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे क्रीडा कौशल्य वाढविण्यासाठी शासनाकडून कशा प्रकारे मदत झाली पाहिजे याविषयी मत मांडले.
००००

No comments:
Post a Comment