मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र
राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सक्षमीकरणासाठी शासनाने सुरू
केलेल्या अटल महापणन विकास अभियानात कृषी पूरक व्यवसाय उभारण्यात लातूर विभाग
आघाडीवर आहे. अभियानाच्या मुल्यमापन आणि संनियंत्रण विभागामार्फत राज्यातील सहकारी
संस्थांच्या कृषी पूरक व्यवसायांची जिल्हानिहाय माहिती घेण्यात आली त्यानंतर सहकार
मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली.
श्री. देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ५ हजार विविध कार्यकारी सेवा
सहकारी संस्थेच्या सक्षमीकरणासाठी जिल्हयातील गावां गावांमध्ये सहकारी संस्थांना
कृषी पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.या व्यवसायांना गती
देण्यासाठी महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन
अभियान यांच्या संयुक्त विद्यमातून फेब्रुवारी २०१९ मध्ये विशेष मोहिम आखण्यात आली
होती. या मोहिमेमध्ये कमी गुंतवणूकीतून अधिकाधिक नफा देणारे व्यवसाय सुरू
करण्यासाठी विभागांमार्फत सहकारी संस्थांची क्षमता बांधणी करण्यात आली आहे.
सहकारी संस्थांनी आपल्या योगदानातून विविध
व्यवसायांची सुरूवात केली आहे. त्यामध्ये धान्य चाळणी यंत्र, शेतकरी सेवा
केंद्र, भांडार व दुकाणे भाडयाने देणे, धान्य खरेदी – विक्री, कृषीसाठी
वाहतूक व्यवस्था करणे, प्रक्रिया पॅकेजिंग व आर.ओ. वॉटर
एटीएम सुविधा आदींचा समावेश आहे. या विशेष
मोहिमेंतर्गत लातूर विभाग ४५, अमरावती विभागात ४०, नागपूर ४३, कोकण २५ व नाशिक विभागात १३ नवीन कृषी
पूरक व्यवसाय सुरू झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात १६६ व्यवसाय सुरू झाले
आहेत. गेल्या ६ महिन्यात ४९६ तर
अभियानातील दोन वर्षाच्या काळात २ हजार ५०० पेक्षा जास्त कृषी पूरक
व्यवसाय सुरू झाले आहेत.जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक, जिल्हा विपणन व व्यवसाय व्यवस्थापक यांच्या एकत्रित प्रयत्नातून
फेब्रुवारी महिन्यात सहकारी संस्थांनी व्यवसाय सुरू केले
सहकारी संस्थांना ॲग्री
बिझीनेस मार्गदर्शन मिळाण्यासाठी रिलायन्स सोशल फाऊंडेशन च्या मदतीने संस्थांना
व्हॉइस संदेश पाठविण्यात येत आहेत. त्यामध्ये संस्थांना व्यवसायासंदर्भातील अडचणी
सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुध्दा सुरू केली आहे, असेही श्री. देशमुख यांनी
सांगितले.
००००
No comments:
Post a Comment