Monday, 16 December 2019

इयत्ता 10 वी प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर

नागपूर, दि. 16 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी फेब्रुवारी/मार्च 2020 च्या परीक्षेला बसणाऱ्या विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची तसेच तंत्र व एसक्युएफ अंतर्गत पूर्व व्यावसायिक विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा  तसेच दिव्यांग (अंधअपंगमूक-बधीरबहुविकलांग व अध्ययन अक्षमता)  असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विषययोजनेतील कार्यानुभव विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2020 मध्ये घेण्यात येणार असल्याचे मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचित केले आहे.
इयत्ता 10 वी ची प्रात्यक्षिक श्रेणी व तोंडी परीक्षा गुरुवारदिनांक 13 फेब्रुवारी ते सोमवारदिनांक मार्च 2020 या दरम्यान, तंत्र व एसक्युएफ अंतर्गत पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा गुरुवारदिनांक 13 फेब्रुवारी ते सोमवार, दिनांक मार्च 2020 दरम्यान शरीरशास्त्रआरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा गुरुवारदिनांक 13 फेब्रुवारी ते सोमवार, 2 मार्च 2020 या दरम्यान आऊट ऑफ टर्न परीक्षा मंगळवारदिनांक 24 मार्च 2020 व गुरुवार, 26 मार्च 2020 या दरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यानुभव विषयाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा मंगळवारदिनांक 24 मार्च ते शुक्रवारदिनांक एप्रिल 2020 पर्यंत घेण्यात येणार आहे.  मुख्याध्यापकांनी प्रात्यक्षिक परीक्षेचे नमूद दिनांकास आयोजन करावे व सदर परीक्षेचे वेळापत्रक विभागीय मंडळास त्वरित कळवावे.
इयत्ता 10 वी च्या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. कोणत्याही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षेचे मागील परीक्षेचे गुण ग्राहय धरण्यात येणार नाही. इयत्ता 10 वी मार्च 2020 च्या परिक्षेस नियमित परीक्षार्थी म्हणून प्रविष्ट दिव्यांग विद्यार्थीसाठी असलेल्या घरगुती विद्युत उपकरणे या विषयची परीक्षा मंगळवारदिनांक 24 मार्च 2020 दूध व दुधाचे पदार्थ या विषयाची परीक्षा गुरुवारदिनांक 26 मार्च 2020 रोजी, हस्तभरतकाम या परीक्षा शुक्रवार, 27 मार्च 2020 रोजी, शिवणयंत्रणाद्वारे शिलाई व शिवणयंत्राची निगा व दुरुस्ती या विषयांची परीक्षा शनिवारदिनांक 28 मार्च 2020 टाकाऊ वस्तूपासून सौंदर्याकृती या परीक्षा सोमवारदिनांक 30 मार्च 2020 पाककला विषयाची परीक्षा मंगळवारदिनांक 31 एप्रिल 2020 या भारतीय संगीत (गायन- वादन) परीक्षा बुधवारदिनांक एप्रिल 2020 रोजी, चित्रकला व रंगकाम परीक्षा गुरुवारदिनांक एप्रिल 2020 तर कागदकामपुठ्ठाकाम व पुस्तकबांधणी या विषयाची परीक्षा शुक्रवारदिनांक एप्रिल 2020  रोजी घेण्यात येणार आहे.
प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य निर्धारित दिनांकास मंडळ कार्यालयात जमा झाले नाही किंवा उशिरा प्राप्त झाले व त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षेच्या गुणाअभावी निकाल राखीव राहिल्यास याबाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील याची नोंद घ्यावीअसे आवाहन मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी केले.
000000

No comments:

Post a Comment