Friday, 20 December 2019

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील नोंदणीची अंतिम मुदत 31 डिसेंबर


        नागपूर, दि. 20 :जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील उमेदवारांची www.mahaswayam.in या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याकरिता सूचना देण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील शिकत असलेले व उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नोंदणी झालेली नाही. सर्व जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी साप्ताहिक माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे पुरवावी. तसेच दिनांक 31 डिसेंबर 2019 पर्यंत संपूर्ण उमेदवारांची नाव नोंदणी झाल्याचा अहवाल सादर करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक प्र. हरडे यांनी केले.
            अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या श्रीमती आशा कमलाकर व दीपक इंगळे यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 0712-2531213 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. 
******

No comments:

Post a Comment