Friday, 20 December 2019

बेवारस बालकांबाबत निवेदन


      नागपूर, दि.20 :  रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना  दिनांक 17 जून रोजी रेल्वे स्थानकाच्या प्लॅट फॉर्म क्रमांक 1 वरील पुलाखाली माही नामक बालिका  अंदाजे पाच महिन्यांची, वर्ण सावळा ही बेवारस  स्थितीमध्ये आढळून आली.  रेल्वे पोलिसांना अद्याप बालिकेच्या पालकांचा शोध लागला नाही. आयुषी नामक बालिका ही बेलतरोडी पोलीस स्टेशन  हद्दीत प्लॉट नं.20, घरकूल सोसायटी, म‍नीष नगरच्या बाजूला दोन दिवसाची असतांना दिनांक 18 ऑगस्ट 2019 रोजी बेवारस ‍स्थितीत आढळून आली. पोलिसांना आतापर्यंत त्या बालकांच्या पालकांचा शोध लागला नाही.
          तेजस नामक बालक वय 3 दिवस हा सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 28 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता पंजाब नॅशनल बँक जवळ फुटपाथवर बेवारस स्थितीत आढळून आला. पोलिसांनी शोध घेतला असतांना त्याचे आई-वडिल मिळाले नाहीत.
            बालकांवर हक्क दाखवायचा असलेल्या पालकांनी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती अपर्णा कोल्हे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण दरध्वनी क्रमांक 0712-2569991 दहा दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती अपर्णा कोल्हे यांनी केले आहे.
बेवारस बालकांबाबत पालक अथवा नातेवाईकांनी संपर्क न साधल्यास केंद्रीय दत्तक प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या नियमावलीनुसार बाल कल्याण समितीच्या आदेशाने दत्तक मुल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
            महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या  माध्यमातून काळजी व संरक्षणाची गरज असलेली  बालके व विधी  संघर्षग्रस्त बालकांकरिता कार्य केले जाते.  रस्त्यावर सोडून दिलेल्या व घरन निघून आलेल्या बालकांचे पुनर्वसन व पालन पोषणाची जबाबदारी जिल्हा महिला व बाल विकास विभागाने स्विकारली असल्याची माहिती  श्रीमती अपर्णा कोल्हे यांनी दिली आहे .   
******

No comments:

Post a Comment