नागपूर दि. 18 : मुंबईतील वडाळा येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलेल्या ॲन्टॉप हिलचे विजय सिंह यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी एस.आय.टी. (विशेष तपास पथक) मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीवरील सूचनेच्या चर्चेच्यावेळी दिली.
या विषयासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य भाई गिरकर यांनी मांडली होती.
यावेळी श्री.शिंदे म्हणाले, या प्रकरणात एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, एक हेड कॉन्स्टेबल, एक पोलीस नाईक व एक पोलीस कॉन्स्टेबल यांना 29 ऑक्टोबर, 2019 रोजी निलंबित करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी गु.प्र.शा., गु.अ.वि.कक्ष-4 यांच्याकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी के.ई.एम. हॉस्पिटलकडील डेथ ऑफ कॉजचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे.
राज्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत तसेच सदस्यांनी केलेली मागणी व त्यांच्या भावना लक्षात घेता या प्रकरणाची एस.आय.टी. मार्फत चौकशी करण्यात येणार आहे, असे श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री डॉ.रणजित पाटील, प्रसाद लाड, हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.
00000
No comments:
Post a Comment