Wednesday, 18 December 2019

‘कदाचित अजूनही’ काव्य संग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार


नवी दिल्ली, दि. 18 : प्रसिद्ध मराठी कवयित्री अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनहीया काव्य संग्रहास वर्ष 2019 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला.
साहित्य अकादमीच्यावतीने आज वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी  प्रसिध्दी पत्रकाद्वारे देशातील 23 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावांची  घोषणा केली. कवयित्री अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनहीया काव्य संग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली आहे.

                            'कदाचित अजूनहीया काव्यसंग्रहाविषयी

स्वतंत्र प्रतिभाशक्तीमुळे मराठी कवितेवर स्वतंत्र मुद्रा उमटविणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांचा 'कदाचित अजूनहीहा पाचवा काव्यसंग्रह आहे. या काव्य संग्रहातील कवितांच्या माध्यमातून त्या संयत विवेकशील सुरात माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करतात. या सगळ्या कवितांमधून एक प्रार्थनाच जणू त्या मानवजातीसाठी करीत आहेत. या संग्रहातील कविता स्त्री दु:खाची दुखरी नस नेमकी पकडून संवादी होतात. या काव्यसंग्रहात राने-वनेझाडे-झुडपेनद्या-समुद्र-वारेचंद्र-सूर्य असा निसर्ग मोठ्या प्रमाणावर येतो. या सर्व कविता ग्रामीण संस्कृतीशेती संस्कृती आणि एतद्देशीय परंपरेशी घट्ट नाते सांगणाऱ्या आहेत. बदलत्या ग्रामीण जीवनाचे चित्रण या काव्य संग्रहात असून गावाकडील जीवनाच्या नव्या दु:खी कंगोऱ्यांचे तटस्थ दर्शनही घडते. मुंबई येथील शब्द प्रकाशनाने 'कदाचित अजूनहीहा 128 पृष्ठांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.
अनुराधा पाटील गेल्या 40 वर्षांपासून सातत्याने कविता लिहीत आल्या असून दिगंत’,  ‘दिवसेंदिवस’, ‘तरीही’, ‘वाळूच्या पत्रात मांडलेला खेळ’ हे त्यांचे  प्रसिद्ध काव्य संग्रह आहेत.
            या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपयेताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी  25 फेब्रुवारी 2020 रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे,  लक्ष्मण माने आणि वासुदेव सावंत  यांचा समावेश होता.                             
000

No comments:

Post a Comment