नागपूर, दि. 18 : राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत
मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांबरोबर शालेय शिक्षण
मंत्री, वित्त मंत्री व संबंधित
अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लक्षवेधी सूचनेवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर
यांनी दिले.
विधानपरिषद सदस्य श्री. विलास पोतनीस
यांनी राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात लक्षवेधी
सूचना मांडली होती. त्यावर सभापतींनी शिक्षणमंत्र्यांना निर्देश दिले.
शिक्षण
मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, सर्व
शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये इयत्ता आठवी पर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा आहे.
मात्र, दहावीला हा विषय ऐच्छिक आहे.
दहावीला सुद्धा मातृभाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात इतर राज्यांनी केलेल्या
उपाययोजनांचा अभ्यास करून राज्यातही मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भात योग्य तो
निर्णय घेण्यात येईल.
या
विषयावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, हेमंत टकले, रामदास कदम, ॲड. अनिल परब आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment