Tuesday, 17 December 2019

चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही विकास कामांना स्थगिती नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे






महाकाली मंदिराचा आराखडा पूर्ण करणार
  • सीमेवरील वादग्रस्त 14 गावांसाठी विशेष बैठक घेणार
  • नक्षलग्रस्त भागातील सर्व जिल्ह्यांना दिवसा कृषी पंपासाठी वीज पुरवठा करणार
  • नागभीडसिंदेवाही,ब्रह्मपुरीसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण पूर्ण करणार

नागपूर दि 17 डिसेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांसाठी कोणतीही स्थगिती कुठल्याही कामांना दिली नसून प्रगतीपथावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. तेलंगाना व महाराष्ट्राच्या सीमेवरील वादग्रस्त 14 गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येईल. तसेच चंद्रपूरसह, गडचिरोली,गोंदिया नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये कृषी पंपांना दिवसा ओलीत करण्यासाठी वीज पुरवठा उपलब्ध करण्या संदर्भात बैठक घेण्यात येईलअसे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
नागपूर अधिवेशनादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत उपस्थित अधिकाऱ्यांना मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीला गृहमंत्री एकनाथ शिंदेसार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवारसुभाष धोटेकिशोर जोरगेवारकीर्तीकुमार भांगडीया, प्रतिभा धानोरकरमुख्य सचिव अजोय मेहतामहसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणीविकास खारगेजलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहेलविभागीय आयुक्त संजीव कुमारजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेयांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सर्वच आमदारांनी जिल्ह्यांमध्ये कृषी पंपांना रात्री वीज पुरवठा होत असल्यामुळे जंगला शेजारील शेतकऱ्यांना आपल्या जिवाला धोक्यात घालावे लागत असल्याबाबतची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात  विद्युत विभाग व अन्य विभागाची बैठक लावून निर्णय घेण्याचे त्यांनी निर्देशित केले.
चंद्रपूरच्या बाबुपेठ पुलाचा निधी लवकर वितरित केल्या जाईल. महाकाली मंदीराचा कृती आराखडा पुर्ण होईल. 14 वादग्रस्त गावांचा सीमाप्रश्न सोडवीण्यासाठी उच्चस्थरीय बैठक घेतली जाईल. तसेच कार्यादेश देण्यात आलेल्या कोणत्याही कामांना स्थगिती दिली गेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी बैठकीच्या सुरुवातीला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांधकाम नगर विकास व अन्य महत्त्वाच्या विभागातील विकास कामांवर स्थगिती आणली असल्याचे प्रशासनकडून पत्र मिळाल्याचे सांगितले. महाकाली मंदिरा सारख्या प्रकल्पाला देखील निधी देण्यास स्थगिती आल्याचे कारणे सांगत असल्याचे स्पष्ट केले. तसेच चांदा ते बांदा योजनेला तीन वर्ष मुदतवाढ दयावीहुमन प्रकल्प पूर्णत्वास न्यावाचंद्रपूर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यासाठी राज्यपालांनी मंजूर केलेल्या 500 कोटी मधील कामांना स्थगिती देऊ नयेसैनिकी शाळा अन्य विकास कामे निधीअभावी रखडू नये अशी विनंती केली.
आ. विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील रेतीचा उपसा थांबल्यामुळे आवास योजनेच्या कामावर झालेल्या विपरीत परिस्थितीची जाणीव मुख्यमंत्र्यांना करून दिली तसेच गोसीखुर्द प्रकल्पाचे विविध काम अधिक गतीने पूर्ण व्हावेयासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली. ब्रह्मपुरी येथे नवीन एमआयडिसी दयावीजिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची तातडीने वितरण व्हावेअशी मागणी केली. 
आ. अशोक धोटे यांनी प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत रखडलेली कामे पूर्ण व्हावी. वनहक्क कायद्यामुळे जुन्या शेतकऱ्यांना वहिवाटीत येत असलेली समस्या सुटावीग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीला गती मिळावी. भंडारा प्रकल्प पूर्ण व्हावा. वन्यजीव व मानव संघर्ष यामध्ये लक्ष घालण्याचे तसेच गडचांदूर रेल्वेच्या प्रलंबित मार्गाकडे लक्ष देण्याची विनंती केली. याशिवाय 14 वादग्रस्त गावांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याची मागणी त्यांनी प्रामुख्याने केली.
            आ.बंटी भांगडिया यांनी गोसीखुर्द व शिवनाला योजना निधी अभावी रखडला असून घोडाझरी तलावावरील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच नागभीड उपजिल्हा रुग्णालयाला निधी देण्यात यावानागभीडतळोधी येथील नवीन पोलीस स्टेशन तयार करण्यात यावे. भेंडाळा प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली.
     आ. किशोर जोरगेवार यांनी बाबूपेठ उड्डाणपुलाची समस्या तातडीने सोडविण्यात यावी. या पुलाचे काम लवकर सुरू करण्यात यावे. चंद्रपूर शहरासाठी इरई धरणाशिवाय पाणीपुरवठ्यासाठी धानोरा धरणाची निर्मिती व्हावी. अमृत योजनेला गती मिळावी. महाकाली मंदिर व क्रीडा संकुलाचे थांबलेले बांधकाम निधी देऊन गतिशील करण्यात यावे. जिल्हा सामान्य रुग्णालयात औषध पुरवठा नियमित व्हावा. आरोग्य विभागातील पदभरती व्हावी. औद्योगिक जिल्हा असतानासुद्धा वेगळे कामगार आयुक्त नसल्यामुळे होणारी हेळसांड थांबवावी. याच जिल्हयासाठी हे पद दयावे,अशी मागणी केली.
      आ. प्रतिभा धानोरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीवरोरा येथील समस्या मांडल्या. वरोरा येथील दिंडोरा बॅरेज पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, (सीटीपीएस ) प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेण्याची मागणी केली. यासोबतच ग्रामीण भागाची आवश्यकता असणाऱ्या तलाठी पदांना मुख्यालयी राहणे अनिवार्य करावेया मागण्या मांडल्या.
          जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सुरुवातीला जिल्ह्याचा आढावा सादर केला जिल्ह्याला विविध योजनांमध्ये मंजूर झालेल्या 60 टक्के निधी खर्च झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment