नागपूर, दि. 18 : राज्यशासनाने स्थापन केलेल्या छत्रपती शाहू
महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास
संस्थेमार्फत (सारथी) देण्यात येणाऱ्या कोणत्याही शिष्यवृत्ती थांबविण्यात आल्या नाहीत
सारथीच्या शिष्यवृत्ती योजना सुरुच राहणार असल्याची माहिती इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विजाभज व विमाप्र कल्याण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी
दिली.
विधानपरिषदेत सदस्य सर्वश्री विनायक
मेटे, सदाशिव खोत, अंबादास दानवे, प्रवीण दरेकर आदींनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर डॉ. राऊत बोलत होते.
डॉ. राऊत म्हणाले, सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती यापुढील
काळातही सुरूच राहणार आहे. यासंबंधी यापूर्वी काढलेले परिपत्रक रद्द करण्यात आले
आहे. तसेच या संस्थेची स्वायता संपुष्टात आणण्याचा अथवा मराठा, कुणबी, कुणबी मराठा समाजाच्या
विद्यार्थ्यांच्या हिताच्या कल्याणकारी उपक्रमांवर बंदी घालण्याचा शासनाचा कोणताही
हेतू नाही. संस्थेचे कामकाज शासकीय नियमानुसार व्हावे व मराठा समाजातील तरुणांना
योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासन
प्रयत्नशील आहे.
००००
No comments:
Post a Comment