Friday, 24 January 2020

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र


मुंबई, दि. 24 : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी शिवाजी पार्क, दादर येथे होणाऱ्या संचलन समारंभात दहशतवादी अथवा असामाजिक तत्वांकडून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी शिवाजी पार्क हवाई क्षेत्र उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकान्वये देण्यात आले आहेत.
०००००

No comments:

Post a Comment