Friday, 24 January 2020

मुंबई उपनगर येथे साजरा होणार राष्ट्रीय मतदार दिन


मुंबई, दि. 24 : भारतात 25 जानेवारी, 2020 रोजी 10 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा होत असून त्यासाठी सशक्त लोकशाहीकरिता निवडणूक साक्षरता (Electoral Literacy for Stronger Democracy) हा विषय भारत निवडणूक आयोग यांनी दिलेला आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघाच्या स्तरावर व जिल्हास्तरावर राष्ट्रीय मतदार दिवसाचे’  आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी दिली आहे.
दि. 01 जाने 2020 रोजी वय वर्षे 18 पूर्ण केलेल्या नागरिकांची मतदार नाव नोंदणी असो वा मतदार यादीमध्ये नाव असलेल्या मतदाराच्या ओळखपत्रातील तपशिलामध्ये सुधारणा असो, याबाबतची सुविधा www.nvsp.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय अधिक चौकशीसाठी  https://ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर व हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधण्याबाबत मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. बोरीकर यांनी आवाहन केले आहे.
0000

No comments:

Post a Comment