Thursday, 23 January 2020

पु.ल.देशपांडे कला अकादमी व कलांगण यांचा संयुक्त उपक्रम


चित्रपट निर्मितीसदर्भात 25 जानेवारीला विनामूल्य कार्यशाळा
मुंबई, दि. 23 :  पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि कलांगण यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 25 जानेवारीला सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत ‘चित्रपट निर्मितीमधील आवाहन आणि संधी’ याबाबत विनामूल्य मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत असतात. या प्रयत्नांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. चित्रपट क्षेत्रातील संधी, आव्हाने याबाबत माहिती उपस्थितांना या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कलांगण सांस्कृतिक मंचच्या 918692846737 या क्रमांकावर संपर्क साधावा. चित्रपट क्षेत्रात करियर करु इच्छिणाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पु.ल.देशपांडे कला अकादमीचे संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
००००

No comments:

Post a Comment