Friday, 8 July 2016

9 जुलै रोजी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियोजन भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ

नागपूर दि.8 :   सदर येथे जुन्या ग्रामीण तहसिल कार्यालयाच्या जागेवर एक भव्य जिल्हा नियोजन भवन बांधण्यात येत आहे. या इमारतीचा पायाभरणी समारंभ उद्या शनिवार दि.9 जुलै रोजी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि जहाज बांधणी विभागाचे मंत्री नितीन गडकरी राहतील. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती राहील.
या कार्यक्रमास महापौर प्रविण दटके, खासदार अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने, आमदार सर्व श्री नागो पु. गाणार, प्रकाश गजभिये, जोगेंद्र कवाडे, अनिल सोले, गिरीष व्यास, सुनिल केदार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधीर पारवे, मिलींद माने, सुधाकर देशमुख, समीर मेघे, सुधाकर कोहळे, आशिष देशमुख, डी. मल्लिाकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निशा सावरकर उपस्थित राहतील. असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी कळविले आहे.
0000000

No comments:

Post a Comment