Sunday, 3 July 2016

आय.आय.एमचा विकास आराखडा तातडीने तयार करावा ----मुख्यमंत्री

Þ     विकास आराखड्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आर्किटेक नेमावा
                         Þ  मिहानमधील जमिनीवर संरक्षण ‍भिंत उभारावी
नागपूर, दि. 3 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेटला मिहान प्रकल्पातील नॉन एसईझेड भागातील मौजा दहेगाव येथील 200 एकर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. सध्या 143 एकर जागा 1.5 चटई निदैशांकासह भाडे पटट्याने 99 वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. या जागेवर आय.आय.एमने तातडीने बांधकाम सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी  आज बैठकीत दिली.
हैद्राबाद हाऊस येथे आज आय.आय.एमच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला यावेळी केन्द्रीय रस्ते  वाहतूकमंत्री नितिन गडकरी , पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रविण दटके,अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.पी.एस.मीना, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आय.आय.एम संचालक डॉ. आशिष नंदा, प्रकल्प प्रशासक एम. व्ही. अलूर, व्ही.एन. आय. टी.चे अध्यक्ष विश्राम जामदार उपस्थित होते.
आय.आय.एम.चा मिहानमध्ये  कायमस्वरूपी कॅम्पस उभारण्यासाठी प्रयत्न करावे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्किटेककडून बांधकामाचा आराखडा तयार करून घ्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी  यावेळी सांगितले.
केंन्द्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी आय.आय.एमची स्व:ताची ईमारत उभी राहण्यासाठी कालमर्यादा ठरवावी तसेच काही अडचणी असल्यास सांगाव्या यासंदर्भात संबंधित केन्द्रीय मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येईल आंतरराष्ट्रीय दर्जाची ही संस्था व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करावे असे आवाहन बैठकीत केले.
मिहानमध्ये आय.आय.एमच्या जागेवर संरक्षक भिंत बांधण्याचे काम सूरू आहे. 16-17 यावर्षात  महसूल खर्च 5.36 कोटी, भांडवली खर्च 8.1 कोटी याशिवाय अतिरिक्त निधी 5 कोटी प्राप्त झाला आहे. राज्यशासनाने आरक्षित केलेली मिहान येथील जागा कायम मालकी हक्कावर ध्यावी असे बैठकीत सांगण्यात आले.
आयएमए नागपूर ही संस्था व्ही.एन.आय.टी या संस्थेच्या तात्पुरत्या परिसरामध्ये 15-16 च्या प्रथम बॅचसह 23 जुलै 2015 पासून 60 विद्यार्थ्यासह सुरू करण्यात आली. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षक पदावर आय.आय.एम अहमदाबाद येथील संस्थेचे शिक्षक कार्यरत आहे.

या बैठकीस, आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, डॉ. आशिष देशमुख,सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, समीर मेघे, नागो गाणार, डॉ. मिलिद माने, विकास कुंभारे,  जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment