Thursday, 7 July 2016

उपराष्ट्रपती मो. हामीद अन्सारी शुक्रवारी नागपुरात नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या स्थापना कार्यक्रमास उपस्थिती

नागपूर, दि. 7 :  उपराष्ट्रपती मो. हामीद अन्सारी  यांचे  शुक्रवार, दिनांक 8 जुलै रोजी  दिल्लीहून दुपारी 4.40 वाजता विशेष विमानाने नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर  दुपारी 4.50 वाजता नागपूर विमानतळावरुन  डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाकडे प्रयाण करतील. सायंकाळी  5 वाजता नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या स्थापना दिवस सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सायंकाळी 6.00 वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहातून नागपूर विमानतळाकडे प्रयाण.  सायंकाळी   6.15  वाजता नागपूर विमानतळावरुन ते दिल्लीकडे प्रयाण करतील.

*****  

No comments:

Post a Comment