नागपूर, दि. 15 : राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत माहे मार्च 2017 चा महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे 20 मार्च 2017 रोजी सोमवारी सकाळी 11.00 ते 12.00 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही दिनाच्या तक्रारीचे खालील प्रमाणे निकष आहेत.
अर्ज विहीत नमुन्यात असावा. (नमुना प्रपत्रासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रांची यादी सोबत जोडली आहे) तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा., तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे.
खालील प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही -
न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती जोडलेला अर्ज, सेवा विषयक, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसावे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
** * * * **
No comments:
Post a Comment