४ जून #दिनविशेष
बौद्ध धर्माचे जगद्विख्यात पंडित #धर्मानंददामोदरकोसंबी यांचा स्मृतिदिन.मराठी नियतकालिकातील गौतम बुद्धावरील लेख वाचून,त्यांचे बौद्ध धर्माविषयी कुतूहल जागृत झाले.बौद्धविहारांमधून भिक्षुधर्माची दीक्षा घेऊन, त्यांनी पाली भाषा-साहित्याचा सखोल अभ्यास केला.
बौद्ध धर्म तत्वज्ञानाप्रसारार्थ अनेक मराठी ग्रंथ त्यांनी लिहिले. 'आनंदविहार' आणि 'बहुजनविहार' ह्या संस्थाही त्यांनी मुंबईत स्थापिल्या. विसुद्धिमग्ग हा महापूर्ण ग्रंथ त्यांनी प्रथम रोमन लिपीत तयार केला. १९४० मध्ये त्यांनी तो देवनागरीतही संपादून प्रकाशित केला. बुद्धलीलासारसंग्रह, बुद्ध धर्म आणि संघ, निवेदन, समाधिमार्ग, बौद्ध संघाचा परिचय, भगवान बुद्ध, बोधिसत्त्व, सुत्तनिपाताचे मराठी भाषांतर, पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म हे त्यांचे उल्लेखनीय मराठी ग्रंथ होत.
४ जून १९४७ रोजी सेवाग्राम (#वर्धा) येथे त्यांचे निधन झाले.


