Thursday, 9 March 2017

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई जिल्हयात दिड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

नागपूर, दि. 8 :  राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हयात चार ठिकाणी केलेल्या धडक कारवाईमध्ये तीन आरोपीकडून बनावट विदेशी दारु तसेच गावठी मद्यसाठा  रुपये दिड लाख  किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शहरातील राजाबाक्षा, हनुमान मंदिर, गुरुदेव नगर, विनकर कॉलोनी तसेच हिंगणा तालुक्यातील भिवसनखोरी येथे करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त श्रीमती उषा वर्मा, अधीक्षक श्रीमती स्वाती काकडे आणि उपाधीक्षक मिलींद पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशांत गोतमारे यांनी केलेल्या कारवाईमध्ये  दिलीप नायडू व शुभम उर्फ कार्तिक धार्मिक यांच्याकडून राजाबाक्षा हनुमान मंदिर येथे वाहन क्रमांक एमएच 31 एजी-2367 मधून, तसेच विणकर कॉलोनी, इसासनी  येथील कार्तिक धार्मिक याच्या घरातूनही विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला.  वरील तिन्ही  ठिकाणावरुन जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत  1 लाख 24 हजार रुपये असून  आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने 9 मार्चपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाची पोलिस कोठडी ठोठावली आहे. तसेच भिवसनखोरी येथील धीरज भगत याला मोतीबाग परिसरातून अटक करुन 110 लिटर मोहा गावठी दारु व दुचाकी वाहन असा एकूण 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई  निरीक्षक प्रशांत गोतमारे, सहायक दुय्यम निरीक्षक चंदू दरोडे, जवान सुधीर मानकर, समीर सईद, प्रकाश मानकर, महादेव कांगने, धवल तिजारे, विनोद डुंबरे, मिलींद गायकवाड आणि श्रीमती स्नेहा पवार यांनी केले.

*****

No comments:

Post a Comment