Friday, 31 March 2017

करंजे (जि. सातारा) गावातील रस्ता रुंदी करणासाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने करावी - सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 29 : सातारा जिल्ह्यातील करंजी नाका व महालक्ष्मी ते गोडवली रस्त्यांचे काम अपूर्ण असून या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागा सातारा नगरपरिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाली नाही. याबाबत भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
सातारा जिल्ह्यातील मोळाचा ओढा ते गोंडाली रस्त्याच्या चौपदीकरणाचे काम अपूर्ण असल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुभाष साबने यांनी उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मोळाचा ओढा ते गोंडाली रस्त्याच्या कामासाठी 23.20 कोटी रुपयांची मान्यता मिळाली असून हे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 21.20 कोटी रुपये या कामावर खर्च करण्यात आला आहे. कारंजे गावाच्या रस्त्यांसंदर्भात भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होऊन जमीन ताब्यात आल्यानंतर यासाठी लागणाऱ्या कामाचा निधी वितरीत करण्यात येईल.
००००००

No comments:

Post a Comment