मुंबई, दि. 29 : गेल्यावर्षी नाशिक येथे मुंबई -आग्रा महामार्गावर आढळून आलेल्या बनावट नोटाप्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे गृह राज्यमंत्री डॅा. रणजित पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषद सदस्य डॅा. अपूर्व हिरे यांनी याप्रकरणी लक्षवेधी मांडली होती. यावर उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते. नाशिक येथे मुंबई -आग्रा महामार्गावर धुळ्याहून येणारया 3 मोटार गाड्यांच्या डीक्कीमध्ये एकूण 1 कोटी 35 लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा व एक लाख 80 हजार रुपये किंमतीच्या 500 व 1 हजार रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या होत्या. या प्रकरणी 23 डिसेंबर 2016 रोजी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात एकूण 14 आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी 12 आरोपींनी अटक करण्यात आली असून उर्वरीत 2 आरोपींपैकी एका आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर दुसऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आला आहे. तपासादरम्यान प्रिंटर झेरॅाक्स मशिन, पेपर कटिंग मशीन, इंक बॅाटल, ए 4 साईजचे कागदाचे रीम असे बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य मिळाल्याची माहितीही श्री. पाटील यांनी सभागृहास दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्रीमती नीलम गोऱ्हे, सदस्य सर्वश्री हेमंत टकले, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.
००००००
No comments:
Post a Comment