मुंबई, दि. 5 : केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पातून खाडीतील नौकानयन मार्गातील गाळ काढण्याचे धोरण स्वीकारले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य मनिषा चौधरी यांनी सातपाटी (दहिसर) खाडीतील नौकानयन मार्गातील साचलेला गाळ काढण्याच्या मागणीसंदर्भात प्रश्न उपस्थित करुन केला होता.
त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भरतीच्या वेळी मच्छिमारांची गैरसोय होत नाही. परंतू ओहटीच्या वेळी होते. सातपाटी येथील गाळ उपशाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु आहे.
केंद्राच्या सागरमाला प्रकल्पातून बंदर उभारणीची कामे सुरु करण्यात आली आहेत. ड्रेझिंग कार्पोरेशन ऑफ इंडीयाच्या माध्यमातून अशा नौकानयन मार्गातील गाळ काढण्याचे धोरण स्वीकारण्यात येईल, त्यासाठी केंद्राचे सहकार्य घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
०००००

No comments:
Post a Comment