नागपूर, दि.2 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 जुलै होती. परंतु अर्ज भरण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन 4 ऑगस्ट 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
सदर योजनेची मुदतवाढ ‘बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठीच’ देण्यात आली आहे. www.agri-insurance.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी स्वत: थेट भरलेले अर्जच मान्य करण्यात येणार असून वाढीव मुदतीचा लाभ घेऊन योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment