Thursday, 21 September 2017

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज
सकाळी 10 वाजता विमानतळावर आगमन


       नागपूर, दि.21 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होत आहे. राष्ट्रपती यांच्या एक दिवसाच्या व्यस्त कार्यक्रमात दीक्षाभूमी, रामटेक येथील श्री शांतीनाथ जैन मंदिराला भेट, ड्रॅगन पॅलेस येथील विपश्यना मेडिटेशन सेंट तसेच सुरेश भट नाट्यगृहाचे उद्घाटन करणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद विमानतळावर स्वागताचा स्वीकार करुन दीक्षाभूमीसाठी प्रयाण करतील. सकाळी 10.25 ते 10.45 वाजेपर्यंत दीक्षाभूमीला भेट देऊन दर्शन करतील. त्यानंतर ते रामटेकसाठी प्रयाण करतील.
          रामटेक येथे सकाळी 11.55 वाजता आगमन होईल. सकाळी 11.55 ते दुपारी 12.10 वाजेपर्यंत श्री शांतीनाथ जैन मंदिराला भेट देतील. त्यानंतर ते रामटेक येथून दुपारी 12.10 वाजता कामठील येथील विपश्यना मेडिटेशन सेंटरसाठी प्रयाण करतील. दुपारी 12.55 ते 1.40 वाजेपर्यंत विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन तसेच विशेष बुद्ध वंदना तसेच विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या उद्घाटन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.40 वाजता येथून राजभवनकडे प्रयाण करतील. दुपारी 2.10 वाजता राजभवन येथे त्यांचे आगमन होईल. तेथे दुपारी 4.00 वाजेपर्यंतची वेळ राखीव राहील.
          नागपूर महानगर पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या रेशीमबाग येथील सुरेश भट नाट्य सभागृहाचे उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रपती यांचे दुपारी 4.15 वाजता आगमन होईल. दुपारी 4.15 ते 5.00 वाजेपर्यंत सुरेश भट नाट्य सभागृहाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून विमानतळाकडे प्रयाण करतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नागपूर विमानतळ येथून सायंकाळी 5.25 वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीसाठी प्रयाण होईल.
****


No comments:

Post a Comment