· शेतकऱ्यांनी पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे
· लाभक्षेत्रामध्ये एक पाळीसाठी पाणी
· जिल्हा पाणी नियोजन समितीची बैठक
नागपूर दि.25 : पेंच प्रकल्पाच्या पाणलोट व लाभक्षेत्रामध्ये या महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नागपूर शहरासाठी पाणी पुरवठ्याची तरतूद केल्यानंतर खरीप हंगामातील पिकांसाठी एका पाळीचे 150 दक्ष लक्ष घनमीटर पाणी देणे शक्य असल्यामुळे लाभक्षेत्रातील पिकांसाठी पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिली.
पेंच लाभक्षेत्रातील प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून एक पाळी पाणी सोडण्याचा कालावधी व तारीख निश्चित करावी. त्याप्रमाणे पिकांसाठी पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्या.
जिल्हा पाणी नियोजन समितीने लाभ क्षेत्रातील पिकांना एक पाळी पाणी देण्याचा निर्णय घेतला असून प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा मर्यादित असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे व पाण्याचा अपव्यव टाळावा. पाणी हे राष्ट्रीय संपती असल्याची जाणीव ठेवून सिंचन शांततेत पारपाडून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
पेंच प्रकल्पाच्या पाणलोट व लाभक्षेत्रामध्ये जून ते ऑगस्टपर्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे तसेच मध्यप्रदेशात चौराई सिंचन प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे या प्रकल्पात अत्यअल्प जलसाठा झाला आहे. त्यामुळे नागपूर शहरास पिण्याचे तसेच लाभक्षेत्रातील सिंचनाचे पाणी देण्यासाठी शासवत जलसाठा उपलब्ध न झाल्याने पेंचच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याबाबत सम्रंभ निर्माण झाला होता. परंतु सप्टेंबर महिन्यात पर्जन्यमान समाधानकारक झाल्यामुळे एक पाळीसाठी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment