· धम्मचक्र प्रवर्तन
दिनाच्या व्यवस्थेचा आढावा
· पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधांना प्राधान्य
· संपूर्ण महोत्सवावर
सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण
· भोजनदानाच्या
सुसुत्रतेसाठी चार फुड झोन तयार करणार
· दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस व चिंचोलीसाठी
विशेष बस व्यवस्थ
नागपूर दि.25 : दीक्षाभूमी येथे आयोजित 61
व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळयासाठी संपूर्ण भारतातून येणाऱ्या लाखो भाविकांना
पिण्याचे पाणी,
आरोग्य सुविधा, तसेच संपूर्ण परिसराच्या
स्वच्छतेवर विशेष लक्ष देऊन धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्सहात साजरा होईल या
दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.
दीक्षाभूमी येथे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात 61 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन
सोहळानिमित्त आयोजनाच्या तयारीचा आढावा पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी घेतला,
त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त अनूप
कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महानगर
पालिका आयुक्त अश्विन मुदगल, माजी मंत्री नितीन राऊत,
स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, सदस्य
विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, पोलीस
उपायुक्त निलेश भरणे, श्री. परदेशी, स्मार्तना
पाटील, महानगरपालिकेचे अपर आयुक्त रविंद्र कुंभारे आदी विविध
विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन
दिनानिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देताना पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत संपूर्ण परिसर स्वच्छ
ठेवावा, तसेच अस्वच्छता कुठेही राहणार नाही याची खबरदारी
घेण्यात यावी अशी सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, विविध
संस्थांकडून मोठ्या प्रमाणात भोजनदान देण्यात येते. यावेळी अन्न व प्रशासन
विभागातर्फे संपूर्ण अन्नाची तपासणी करावी, त्यासोबत
दीक्षाभूमी परिसरातील चारही दिशांना विशेष फुड झोन तयार करुन तेथे सर्व सुविधा व
पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस
विभागातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून वाहतूक व्यवस्था, बाहेरुन येणाऱ्या बसेस व जीप थांबण्यासाठी पार्कींग झोन तसेच दीक्षाभूमी
परिसर व दीक्षाभूमीच्या बाहेरील संपूर्ण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे असेही
त्यांनी यावेळी सांगितले. दीक्षाभूमी दिनांक 28 ते 31 सप्टेंबरपर्यंत महानगर पालिकेने
अस्थाई शौचालय, स्नानगृह, पिण्याच्या
पाण्यासाठी तातपुरते नळ, चौवीस तास स्वच्छता, संपूर्ण परिसर वीजेची व्यवस्था, अंबाझरी घाट येथे
लाईफगार्ड नियुक्त करावे, तसेच येथे पुरेशी विद्युत व्यवस्था
करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्यात.
विभागीय आयुक्त अनूप कुमार
यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध विभागांकडे जबाबदाऱ्या सोपविण्यात
आल्या असून त्यानुसार विभाग प्रमुखांनी दिलेली कामे तात्काळ पूर्ण करावी. संपूर्ण
परिसर स्वच्छ ठेवण्यावर विशेष व्यवस्था करावी, अशा सूचनाही
त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे
यांनी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या विविध सोईसुविधांबाबत यावेळी
माहिती दिली. दीक्षाभूमी परिसरात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून या
नियंत्रण कक्षात सर्व विभागाचे अधिकारी यांची नियुक्त करण्यात येत आहे. या नियंत्रण
कक्षात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक व नावे कळवावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. पावसाचा व्यत्य आलयास भाविकांसाठी
सभोवतालच्या शाळा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार व्यवस्था करण्यात येत
असल्याचे यावेळी सांगितले.
महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या
पाण्यासाठी 220 अस्थाई नळ, 10 टँकर, तातपुरते
शौचालय तसेच मोबाईल शौचालय, स्नानगृह, 235
फ्लड लाईट तसेच तीन पाळयामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आल्याचे
आयुक्त अश्विन मुदगल यांनी सांगितले. दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेससाठी 350 बस फेऱ्या
करण्यात येणार आहेत. तसेच मोरभवन व इतर ठिकाणावरुन बसेसची व्यवस्था करण्यात आली
आहे. ज्या भागात बौध्द बांधव मोठ्या प्रमाणात राहतात तेथून दीक्षाभूमीसाठी विशेष
बस व्यवस्था करावी, असेही बैठकीत ठरले. आरोग्य विभागातर्फे
माताकचेरी येथे सुसज्ज वैद्यकीय व्यवस्था, पोलीस विभागातर्फे
1200 पोलीस तैनात राहणार असून चोवीस तास या संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात
येणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी मंत्री नितीन
राऊत, स्मारक समितीचे सदानंद फुलझेले, विलास
गजघाटे, सुधीर फुलझेले, तसेच
आयोजकांतर्फे विविध सूचना करण्यात आल्यात.
0000000
No comments:
Post a Comment