Monday, 11 September 2017

विभागीय लोकशाही दिनात 3 तक्रारी प्राप्त


नागपूर, दि. 14 : अपर आयुक्त रविंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या विभागीय लोकशाही दिनात नागरिकांकडून 3 तक्रारी  स्वीकारण्यात आल्या. प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये जिल्हाधिकारी, भंडारा-1, जिल्हाधिकारी, वर्धा-1, उपसंचालक, भूमी अभिलेख, नागपूर-1 अशा एकूण 3  तक्रारींचा विभागीय लोकशाही दिनात समावेश होता. नवीन 5 प्रकरणात चर्चा झाली. तसेच जुन्या 9  तक्रारींवर  सुनावणी  घेण्यात आली.
या लोकशाही दिनाला विशेष पोलीस महानिरीक्षक,  नागपूर परीक्षेत्र, नागपूर, महानगर पालिका, जिल्हाधिकारी, सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर, पोलीस अधीक्षक ग्रामीण, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर तसेच  इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                                               **** 

No comments:

Post a Comment