·
प्रशासन
सज्ज
·
सुरक्षा
व्यवस्था चोख ठेवा
नागपूर दि.17 – येत्या नवरात्रीपासून
म्हणजेच दिनांक 21 सप्टेंबर 2017 पासून कोरोडी
येथील श्री श्रेत्र जगदंबा
मातेच्या मंदिरात अश्विन नवरात्र
महोत्सवाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या
सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी मंदिराच्या सभागृहात आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रशासनाच्या वतीने विविध
विभागांना सोपविण्यात आलेली जबाबदारी, त्यांच्या कामांची सद्यस्थिती यावर विभागनिहाय चर्चा करुन पुढील कार्यवाही येत्या
दोन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.
कोराडी
महोत्सवाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या विशेष उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कोराडी ग्रामपंचायतच्या सरपंच
श्रीमती अर्चना मैंद, उपसरपंच अर्चना दिवाने, अश्विन नवरात्र आयोजन समितीचे
उपाध्यक्ष दयाराम तडसकर, केशव फुलझेले, कोराडी महोत्सव समितीचे सदस्य रोहित
अग्रवाल तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र तायवाडे, पोलीस उपआयुक्त रविंद्रसिंग
परदेशी, उपविभागीय अधिकारी अविनाश कातळे, तहसिलदार बाळासाहेब ठडे, परिवहन
व्यवस्थापक शिवाजी जगताप, पर्यटन विभागाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत
हेडे, अधिक्षक अभियंता आर. के. पिंपळे, मुख्य अभियंता अभय हरणे, राजकुमार तासकर,
अनंत देवतारे, पोलीस निरीक्षक सतिश
गोराडे, दिलीप फुलपगारी तसेच सबंधित विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी देवस्थानात येणा-या भाविकांना सर्व सोयीसुविधा
उपलब्ध व्हाव्यात तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने
योग्य ती काळजी घेण्यात यावी याबाबत सुचना
दिल्यात. ग्रामपंचायत कोराडी अंतर्गत उर्जा विभागाच्या वतीने सर्वत्र पथदिव्यांची
व्यवस्था करण्यात आलेली आहेत. साफ-सफाईचे काम अंतिम टप्प्यात आहेत. वाहन पार्किंग
सुविधेसाठी समतल मैदान तयार करण्यात आले आहेत. एखादी अनुचित घटना घडल्यास कंट्रोल
रुम तयार ठेवण्याबाबत यावेळी त्यांनी सूचना दिल्या. आरोग्य विभागाच्या वतीने
नवरात्र महोत्सवाच्या काळात आरोग्य शिबीरे
घेण्यात येणार आहेत. भाविकांना प्रथमोपचाराची सुविधा 24 तास उपलब्ध राहणार आहे.
नगर परिषदेच्या वतीने अग्नीशमन विभाग
सुसज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भाविकांना
परिवहन विभागाच्या वतीने बसेस वेळेत उपलब्ध व्हाव्यात तसेच बस स्थानकावर सी.सी.टी.
कॅमेरे लावण्यात यावेत, मंदिरपरिसरात असलेल्या शौचालयाखेरीज तात्पुरत्या शौचालयाची
सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, पोलीसांच्या वतीने योग्य ठिकाणी बॅरीकेट्स लावून
गर्दीचे योग्य नियोजन करण्यात यावे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने
रस्त्याच्या दूतर्फा असणा-या झाडांच्या अतिरिक्त फांद्यांची कटाई करुन रस्ता
वाहतुकीला मोकळा करण्यात यावा, पाणी पुरवठा विभागाच्या वतीने भाविकांना शुध्द व
स्वच्छ पाणी उपलब्ध होईल याची काळजी
घेण्यात यावी. प्रशासनाच्या वतीने भाविकांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात यावे
तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही अश्विन नवरात्र महोत्सव शांततेत पार पडावा, याची
योग्य ती काळजी घेण्याबाबत सबंधितांना निर्देश दिलेत.
यावेळी
पालकमंत्र्यांनी मंदिराच्या गाभा-यातील तसेच परिसरातील चालू असलेल्या कामांची
पाहणी केली. कोराडी महोत्सव समितीचे सदस्य रोहित अग्रवाल यांनी दिनांक 24 ते 27
सप्टेबर या कालावधीत कोराडी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यातआलेल्या विविध
कार्यक्रमांची माहिती यावेळी दिली.
******

No comments:
Post a Comment