Saturday, 16 September 2017

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे प्रेरणादायी विचार महानाट्याद्वारे सर्वांपर्यंत पोहचतील - देवेंद्र फडणवीस


            नागपूर दि. 16 :-  पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेली अंत्योदयाची संकल्पना तसेच एकात्म मानववादाचे प्रेरणादायी विचार महानाट्याद्वारे सर्वांपर्यंत पोहचतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
            डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रयास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने महानाट्य’ गाथा पंडित दीनदयाल या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन तसेच जलसंपदामंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रा.अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार डॉ. परिणय फुके,  शक्ती ठाकूर, जयप्रकाश गुप्ता तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी महानाट्यातील कलावंतांचा,आयोजकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंडित दीनदयाल यांच्या जीवनावर आधारित महानाट्याची संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण असून या महानाट्याद्वारे पंडित उपाध्याय यांचे प्रेरणादायी विचार जनसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचतील. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी साम्यवाद आणि भांडवलशाही विचारसरणीला एक नवीन पर्याय दिला. सर्वांना जगण्याचा हक्क आहे. हा निसर्गातील एकात्मवाद पंडितजींनी मांडला. दुर्बलांना न्याय देता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे शक्य आहे हे पंडीतजींनी पटवून दिले. हाच विचार त्यांनी एकात्म मानववाद व अंत्योदय या संकल्पनांद्वारे मांडला असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
            केंद्रीय परिवहन तसेच जलसंपदा मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी अंत्योदय आणि एकात्म मानववादाच्या विचारांचा दिलेला ठेवा अमूल्य असा आहे. समाजातील दारिद्रयात जीवन जगणाऱ्या घटकाला परमेश्वर मानून त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहाण्याचा विचार पंडित उपाध्याय यांनी दिला.  आज देशात सर्वाधिक जनधन खाती आहेत. ई-रिक्षाद्वारे सायकलरिक्षा चालविणाऱ्यांचे श्रम कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. कर्करोगाच्या रुग्णांना अत्याधुनिक उपचार देण्यात येत आहे. गरिबांना विविध घरकुल योजनातून घरकुले उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गाथा पंडित दीनदयाल या महानाट्यातून पंडित उपाध्याय यांचे प्रेरणादायी विचार सर्वांनी आत्मसात करावे, असे आवाहनही श्री. गडकरी यांनी यावेळी केले.
            जयप्रकाश गुप्ता म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर आधारित महानाट्याची निर्मिती करण्याचा संकल्प प्रयास संस्थेने केला. आणि त्यातून गाथा पंडित दीनदयाल साकारले. पंडित उपाध्याय यांच्या अंत्योदय व एकात्म मानववाद या वैचारिक संकल्पना या महानाट्याद्वारे उलगडण्यात येत असल्याचे श्री.गुप्ता यांनी सांगितले. सूत्रसंचालन रिचा खंडवानी यांनी केले.

No comments:

Post a Comment