Saturday, 16 September 2017

रोजगार निर्मितीसाठी बांबु क्षेत्राचा विकास आवश्यक--- नितीन गडकरी

जागतिक बांबू दिनाचे आयोजन
 नागपूर दि. 16 :-  रोजगार निर्मितीसाठी बांबू क्षेत्राचा विकास महत्‍वाचा मानला जातो. जल, जंगल, जमीन  व जनावर या विषयावर गहन चर्चा होणे आवश्‍यक आहे. यासाठी बांबू या विषयावर भर देऊन ग्रामीण अर्थ व्‍यवस्‍था मजबूत करण्‍याला प्राधान्‍य  द्यायला हवे. त्‍याकरिता  विज्ञानाचा आधार घेऊन ग्राम तथा शेती आधारित उद्योगा चालना द्यायला हवी असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महाराष्‍ट्र बांबू मंडळ व बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्‍ट्र चॅप्‍टर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने चिट‍णवीस सेंटर जागतिक बांबू दिवस साजरा करण्‍यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व नागपूरच्‍या महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, सुनिल जोशी हे उपस्थित होते.
बांबू पासून बायो सिएनजी इथेनॉल निर्मीती करून पर्यावरणाला पोषक असे वातावरण निर्माण होईल. येत्‍या काही महिन्‍यात मासळ येथे सीएनजी प्रकल्‍प कार्यान्वित करण्‍यात येणार आहे. याकरिता १ हजार टन बांबू रोजी खरेदी करण्‍याचा विचार आहे. गडचिरोली जिल्‍ह्यात रोजगार निर्मिती व्‍हावी यासाठी अगरबत्‍ती प्रकल्‍प उभारूण ग्रामीण तरूणांना रोजगार संधी उपलब्‍ध होईल. असे त्‍यांनी आपल्‍या भाषणातून बोलतांनी व्‍यक्‍त केले.
महाराष्ट्राला देशाचा पायोनियर’ बनवावे लागेल – श्री. मुनगंटीवार
बांबू उत्पादनात महाराष्ट्राला देशाचा पायोनियर बनवावे लागेल. कारण सर्वाधिक वनक्षेत्र महाराष्ट्रात आहे. त्यातही बांबूला पोषक असे क्षेत्रही अधिक आहेअसे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बांबूच्या विकासासाठी आम्ही बांबू संशोधन केंद्रही सुरू केले आहे. टाटा ट्रस्टच्या मदतीने त्याचे कामही सुरू होईल. बांबू विकास महामंडळही स्थापन केली आहे. त्या माध्यमातूनही बांबू उत्पादन व प्रक्रियेवर लक्ष दिले जात असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
गरिबी विरुद्ध लढा उभारण्यासाठी राष्ट्रीय संयुक्त संघाने २०३० पर्यंतची वेळ निश्चित केली आहे. बांबू हा कल्पवृक्ष असून, चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण  केंद्र उभारण्यात आला आहे. या केंद्राची निर्मिती १ लाख २० हजार चौ. फु. असून या केंद्राच्‍या आराखडा टाटा ट्रस्‍ट यांच्‍याकडून मदत घेण्‍यात आली. घोट येथील प्रकल्‍पाकरिता ३०० करोड रूपयांची मदत टाटा ट्रस्‍ट यांनी दिली. गडेचरोली येथील गोंडवाना विद्यपीठातून बांबू विषयावर आधारित अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात आला असून या विद्यपीठातून बांबू निर्मीत प्रकल्‍पांना चालना देण्‍याचे काम होणार आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या ५० कोटी वृक्ष लागवडीसाठी ५ कोटी वृक्ष लागवड बांबू या प्रजातींची करण्‍यात येणार आहे. असे वनमंत्री सुधीर मुनगंटीर यांनी यावेळी सांगितले.
डॉ. भारती यांनी आपल्‍या सादरीकरणातून बांबू विकासाबाबत चर्चा करून बांबू पासून तयार होणा-या वस्‍तूची  तसेच इथेनॉल, सीएनजी, ऊर्जा  या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती. मंजूना यांनी बांबूपासून तयार होणारी घरे, विश्रामगृह, सभागृह उद्यानातील लहान पुल निर्मीती करण्‍याविषयी माहिती दिली तसेच या क्षेत्रात रोजगार निर्मीती मोठ्या प्रमाणात होण्‍यास मदत होईल असे त्‍यांनी आपल्‍या  सादरीकरणात सांगितले. त्‍याचबरोबर तांत्रिक बांबू डेपो निर्मीत करण्‍याची सुचनाही केली.
कार्यक्रमाचे प्रस्‍ताविक आक्रिटेक श्री. सुनील जोशी यांनी केले. याप्रसंगी भारतातील बांबू विषयावर काम करणारे विविध संस्‍थेचे पदाधिकारी, वरिष्‍ठ वनाधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
                                                                        ****

No comments:

Post a Comment