मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास 'कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी वाटचाल’ या विषयावर जलसंपदा, जलसंधारण, संसदीय कार्य तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री राज्यमंत्री विजय शिवतारे यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. दि. १५ व १६ सप्टेंबर रोजी सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यातील जलयुक्त शिवार अभियानातील सद्यस्थिती, सातारा जिल्हयाने जलसंधारण क्षेत्रात निर्माण केलेली आपली वेगळी ओळख, सातारा जिल्ह्यात नद्यांवरील बंधारे दुरूस्ती, ओढा जोड प्रकल्प, वावर तिथे ठिबकची पावर उपक्रम, लोकसहभागातून उभी राहिलेली कामे, जलयुक्त शिवार अभियानामुळे सातारा जिल्ह्यात पाण्याच्या पातळीत झालेली वाढ, बंद पाईपलाईनद्वारे शेतक-यांच्या बांधावर विजेशिवाय सिंचन पथदर्शी प्रकल्प,कॉफीटेबल बुक या विषयीची माहिती दिलखुलास कार्यक्रमात राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे.
००००


No comments:
Post a Comment