Thursday, 14 September 2017

बंद पाईपलाईनने शेतक-यांच्या बांधावर विजेशिवाय सिंचन जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत


            मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी वाटचाल’ या विषयावर जलसंपदाजलसंधारणसंसदीय कार्य तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री राज्यमंत्री विजय शिवतारे यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  प्रसारित होणार आहे. उद्या शुक्रवार दि. १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी  ७:३० ते ८ या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            राज्यातील जलयुक्त शिवार अभियानातील सद्यस्थितीसातारा जिल्ह्याने जलसंधारण क्षेत्रात  निर्माण केलेली आपली वेगळी ओळखसातारा जिल्हयात नद्यांवरील बंधारे दुरूस्तीओढा जोड प्रकल्पवावर तिथे ठिबकची पावर उपक्रमलोकसहभागातून उभी राहिलेली कामे,  जलयुक्त शिवार अभियानामुळे सातारा जिल्ह्यात पाण्याच्या पातळीत झालेली वाढबंद पाईपलाईनद्वारे शेतक-यांच्या बांधावर विजेशिवाय सिंचन पथदर्शी प्रकल्प,कॉफीटेबल बुक या विषयीची माहिती जय महाराष्ट्र कार्यक्रमात राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी  दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment