Monday, 11 September 2017

जपानी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट


             मुंबईदि. 11 : युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय स्मारकं व स्थळं मुल्यांकन समितीचे उपाध्यक्ष जपानचे युकीओ निशीमुरा यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.           
यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर उपस्थित होते. मुंबई हे जागतिक वारसा स्थळं असणारे वैभव संपन्न शहर आहे. पुढील पिढीला मुंबईतील जागतिक वारसा स्थळांच्या देखण्या वास्तू ज्ञात असाव्यात यासाठी वारसा स्थळांची संवर्धन व देखभाल चांगल्या प्रकारे होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मुंबईतील व्हीक्टोरीयन शैलीच्या वास्तूमुळे आपण अत्यंत प्रभावी झाल्याचे उद्‌गार त्यांनी काढले.
            युकीओ निशिमुरा हे जागतिक वारसा स्थळासंदर्भात हेरीटेज समितीनागरिकअभ्यासक यांच्या सोबत बैठका घेणार आहेत.
००००

No comments:

Post a Comment