Thursday, 7 September 2017

राजे उमाजी नाईक यांना मंत्रालयात अभिवादन



मुंबई, दि. 7 : क्रांतीकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनीही त्यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प वाहून अभिवादन केले. तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, उपसचिव श्रीमती वडते, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही जयंती प्रत्येक वर्षी दिनांक 7 सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय दिनांक 29 ऑगस्ट 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.
०००० 

No comments:

Post a Comment