Tuesday, 26 September 2017

जनसंवाद विद्यार्थ्यांना दिली सोशल मीडियाची माहिती

नागपूर, दि. 26 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर येथील कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहितीे घेतली. 
यावेळी संचालक राधाकृष्ण मुळी यांनी दैनंदिन कामकाजाची तसेच लोकराज्य, महाराष्ट्र वार्षिकी, महामानव या प्रकाशनांची आणि महासंचालनालयाच्या विविध फेसबुक, ब्लॉग, ट्विटर हँडलची आणि महान्यूज या माहिती व जनसंपर्कच्या न्यूज पोर्टलची माहिती दिली.
यावेळी विभागाचे डॉ. मोईज हक, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सहाय्यक संचालक जगन्नाथ पाटील उपस्थित होते.
****

No comments:

Post a Comment