Sunday, 17 September 2017

मित्रा अँपदवारे शिक्षकांनी तयार केलेले ई शैक्षणिक साहित्य एकाच प्लॅटफॉर्मवर

शालेय‍ शिक्षण विभागाचा उपक्रम

मुंबई दि. 17प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यात जोमाने तंत्रस्नेही शिक्षण व तंत्रस्नेही शिक्षक यांची चळवळ सुरु झाली. राज्यात आजपर्यंत सुमारे 1 लाख 60 हजार शिक्षक तंत्रस्नेही झाले आहेत तर  62,000 शाळा आज डिजिटल झाल्या आहेत. अनेक शिक्षकांनी उत्तम ई शैक्षणिक साहित्य तयार केले असून हे ई शैक्षणिक साहित्य एका ई- प्लॅटफॉर्मवर आणणे आवश्यक होते.  यासाठीच शालेय शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र विदया प्राधिकरणामार्फत मित्रा   (MITRA- Maharashtra In-Service Teacher Resource App) हे अँप तयार केले आहे. विशेष म्हणजे या अँपमधील बहुतांश ई शैक्षणिक साहित्य हे  शिक्षकांनी शिक्षकांसाठीच तयार केलेले आहे.

21 व्या शतकातील माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. मुलांचे शिक्षण सुलभ आणि आनंददायी व्हावे यासाठी राज्य शासनाने मित्रा अँप आणले असून अध्ययनअध्यापन शास्त्रबालमानसशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा एकत्रित मिलाप म्हणजे मित्रा अँप आहे असे म्हणता येईल. गेल्या काही वर्षापासून तंत्रस्नेही शिक्षक चळवळ सुरु आहे. या काळात अनेक तंत्रस्नेही शिक्षकांनी मुलांना उपयोगी पडणारे व्हिडिओपीपीटीऑनलाईन टेस्ट असे ई साहित्य तयार केले होते. याच सर्व साहित्याला एक डिजिटल व्यासपीठ मित्राच्या स्वरुपात मिळवून देण्यात आले आहे.

प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शाळा डिजिटल करणेशंभर टक्के शिक्षकांना तंत्रस्नेही बनवणेशाळा प्रगत करणे अशी उदिदष्टे निश्चित करण्यात आली आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरात तंत्रस्नेही कार्यशाळांचे  आयोजन करण्यात येत असून जास्तीत जास्त ई साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 100संकल्पनावर आधारीत ई साहित्य निर्माण करणेसर्व विषयातील व सर्व इयत्तांच्या संकल्पनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे यासाठी मित्रा अँपची निर्मिती करण्यात आली आहे.
खरेतर मित्रा अँप हे दोन्ही प्रकारच्या शिक्षकांसाठी आहे. स्वनिर्मिती करणाऱ्या आणि ज्यांना स्वनिर्मिती करता येत नाही त्यांच्यासाठीही उपयुक्त आहे. विदयार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठीशिक्षकांचा व्यावसायिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठीपालक,शिक्षक आणि विदयार्थी यातील दुवा आणि विदयार्थ्यांच्या कौशल्य विकसनासाठी मित्रा अँप महत्वाचे ठरत आहे.

मित्रा अँपचे होणारे फायदयामध्ये मुलांना स्वयंअध्ययन करणे सोपे होणार आहे. आता मुले स्वाध्याय स्वतस्मार्ट फोनवर सोडवू शकतात.तसेच पालकांना आपल्या मुलांच्या प्रगतीची माहिती या अँपमुळे मिळण्यास मदत होणार आहे.
मित्रा अँपमध्ये काय आहे :-
·         शिक्षकांनी विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी तयार केलेले वेगवेगळया विषयावरचे व्हिडिओ,
·         वेगवेगळया विषयावरच्या पीपीटी,
·         अॅनिमेशन,
·         कवितांचे ऑडिओ
मित्रा अँपचे महत्व
·         क्षमता विकसनात मागे असणाऱ्या विदयार्थ्यांना पुढे आणण्यासाठी
·         शासनशिक्षकविदयार्थी आणि पालक यांना जोडणारा दुवा
·         शिक्षकांची गुणवत्ता वाढ होण्यास मदत
·         शिक्षकांची डिजिटल साक्षरतेकडे वाटचाल
मित्रा अँपची वैशिष्टये :-
·         इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत पाठनिहाय ई लर्निंग साहित्य उपलब्धलवकरच इ.१० वी पर्यंतचे सर्व विषयांचे ई लर्निंग साहित्य उपलब्ध होत आहे.
·         पाठ ऑडिओ आणि व्हिडिओ सहित असल्याने मनोरंजनातून शिक्षण
·         महत्वाचे शालेय शिक्षण विभागाचे निर्णय आणि महत्वाची परिपत्रके
·         शिक्षणाशी संबंधित सर्व महत्वाच्या दैनिक घडामोडी
·         प्रशिक्षण दिनदर्शिका

मित्रा अँप कसे डाऊनलोड करता येईल :-

No comments:

Post a Comment