Sunday, 17 September 2017

राज्य शिक्षक पुरस्कारचे आज वितरण

 मुंबईदि. १७ सप्टेंबर : शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या (२०१६-१७) राज्य शिक्षक पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण उद्या (सोमवार) १८ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे होणार आहे.
सोलापूर हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी ११ वाजता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांची या सोहळ्यास विशेष उपस्थिती राहणार आहे.
यंदाच्या राज्य शिक्षक पुरस्कार शिक्षण विभागाने घोषित केले असून सोमवार दि. १८ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एकूण राज्यभरात १०७ शिक्षकांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक प्राथमिक शिक्षक, एक माध्यमिक शिक्षक, प्रत्येक विभागातून एक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, राज्यातून एक कला शिक्षक, एक क्रीडा शिक्षक, एक स्काऊट शिक्षक, एक गाईड शिक्षिका यांना पुरस्कार दिले जातात. राज्यातून १ पुरस्कार अपंग प्रवर्गासाठी देण्यात येतो.
0000

No comments:

Post a Comment