औरंगाबाद,दि. 17 : जगात पारंपरिक ऊर्जेच्या स्त्रोताला मर्यादा
आहेत. त्यामुळे भविष्यात अपारंपरिक ऊर्जेला अनन्यसाधारण महत्व निर्माण होणार आहे.
त्यामुळे या ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सांगितले.
औरंगाबाद येथील वारी एनर्जी लिमिटेडच्या सौर ऊर्जा
दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार संजय सिरसाट, आ. अतुल सावे, महापौर भगवान घडमोडे, जिल्हा परिषद
अध्यक्षा देवयानी डोणगांवकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल
किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव आदी उपस्थित
होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शासनानेही ॲग्री सोलर फिडर कार्यक्रम
सूरू केलो आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलरची वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. या
कार्यक्रमामध्ये सौर ऊर्जा पुरवठा करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे
असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
0000
No comments:
Post a Comment